मिलाग्रीस प्रायमरी स्कूलची शाळा व्यवस्थापन - विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा

Edited by: विनायक गांवस
Published on: February 01, 2026 16:07 PM
views 8  views

सावंतवाडी :  सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा समिती यांची एकत्रित सभा पार पडली. विद्यार्थी ऑनलाईन हजेरी, विद्यार्थी उपस्थिती, शालेय सहल यासारख्या इतर  विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन स्थानिक प्राधि. सदस्य मंगेश तळवणेकर, तसेच विद्यार्थी सुरक्षा स्थानिक प्राधि. सदस्य सौ. भारती मोरे त्याचप्रमाणे  श्रीम. श्रेया देसाई, श्रीम. अलका कासकर, श्री, भगवान राऊळ, श्री, समीर गावडे, श्री, अब्दुल खान तसेच शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. किरण सावंत तसेच श्रीम. अमिता पडते, श्रीम. स्मिता नाटेकर, श्रीम. बबिता सांगळे, श्रीम. सिद्धी सावंत, श्रीम. संगीता गवंडळकर आणि श्री. योगेश वाडकर असे सर्व सदस्य व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी दोन्ही समित्यांच्या वतीने प्रशालेतील उपक्रमशील शिक्षिका सौ. प्राजक्ता कांबळे  यांचा शिक्षक कर्मचारी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड व सहभाग यासाठी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्याप्रमाणे मंगेश तळवणेकर यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सर्वोपरी मदत करण्याचे तसेच AI वर्गासाठी, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.