
सावंतवाडी : शिवसेना नेते, आमदार निलेश राणे यांनी निरवडे येथील राणेसमर्थक खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची भेट घेतली. तळवडे मतदारसंघातून ते निवडून लढविण्यासाठी इच्छुक होते. स्थानिक उमेदवार महायुतीने न दिल्यानं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. यातच निलेश राणेंनी त्यांची भेट घेतल्यान राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गावडे यांनी पक्षानं स्थानिकांना डावलल्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राजकारणात संधी नसल्याची भावना यानिमित्ताने निर्माण झाली होती. प्रमोद गावडे हे कट्टर राणे समर्थक असून नारायण राणेंचे ते गेली तीन दशक काम करत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. यातच शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी श्री. गावडेंची भेट घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.











