
मालवण : कांदळगाव येथील तीव्र उतारावर रिक्षा पलटी होऊन घडलेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. तर रिक्षातील दोन प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. दरम्यान जखमीना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचार करून जखमीना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. ठाणे येथून आलेले एक कुटुंब तारकर्ली येथे राहिले होते. त्यातील वृद्ध व त्यांचा मुलगा दोघेजण तेथील स्थानिक रिक्षा करून देवदर्शनासाठी गेले. कांदळगांव येथे जात असताना सायंकाळी तीव्र उतारावर रिक्षा पलटी होऊन अपघात घडला. जखमीना मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेतली. नगरसेविका पुनम चव्हाण, पंचायत समिती उमेदवार शाम झाड, भाजपा तालुकाउपाध्यक्ष केदार झाड, जयवंत सावंत यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. जखमीना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी माहिती मिळाली..











