ठाकरे गटाला भगदाड

नेरूर देऊळवाड्याच्या सरपंचांसह कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 31, 2026 21:16 PM
views 82  views

कुडाळ :  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच कुडाळ तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भक्ती घाडी आणि उपसरपंच दत्ता म्हाडदळकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शनिवारी 'शिंदे' शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.

नेरूर दुर्गवाड येथील सभेत राजकीय स्फोट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी नेरूर दुर्गवाड येथे आमदार निलेश राणे यांची कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करत महायुतीला पाठिंबा दर्शवला.

प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी :

भक्ती घाडी (सरपंच, नेरूर देऊळवाडा), दत्ता म्हाडदळकर (उपसरपंच), समद मुजावर (माजी उपसरपंच), लक्ष्मी सडवेलकर, मनोज सडवेलकर यावेळी सुशील कदम यांची शिवसेना तालुका सरचिटणीस पदी निवड जाहीर करण्यात आली.

महायुतीची ताकद वाढली

या पक्षप्रवेशामुळे नेरूर परिसरात महायुतीचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख काका कुडाळकर, जि.प. उमेदवार संजय पडते, पं.स. उमेदवार निता नाईक व ममता देसाई, जिल्हा बँक संचालक नीता राणे, अरविंद करलकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, वालावल सरपंच राजा प्रभू, महिला आघाडी तालुका प्रमुख रचना नेरूरकर, संदेश नाईक, रश्मी नाईक यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत झालेल्या या बदलामुळे ठाकरे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, महायुतीने मात्र विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.