
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक २०२६ या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ भंडारी समाजातील खेळाडूंकरिता असून “एक गाव – एक संगम” या संकल्पनेतून प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येणार असून, प्रवेश फी ५०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना ३१ तारखेला सकाळी ९ वाजता खेळविण्यात येणार असून सर्व सामने जिमखाना मैदान सावंतवाडी येथे पार पडणार आहेत. भंडारी समाजातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून अधिकाधिक संघांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










