
सावंतवाडी : रत्नसिंधू जलसंपदा मित्रपरिवार या ग्रुप तर्फे नुकतेच कुडाळ येथे जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनासाठी विशेष योगदान देणारे सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल, कुडाळ या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले हे त्यांच्या मातोश्री आजारी असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचे राहून गेले होते. गुरुवारी आंबडपाल येथे त्यांच्या कार्यालय जाऊन रत्नसिंधु जलसंपदा मित्रपरिवार नियोजन समितीचे सदस्य ॲड. जयसिंग वारंग, राजू तावडे, संजय शेणई, किशोर साळगावकर यांनी श्रीमंगले यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व जलधारा २०२६ ही स्मरणिका देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी भगवान पवार उप विभागीय अभियंता, चिंतामणी वागंड उप विभागीय अधिकारी, विकास परब उप विभागीय अधिकारी, रुपेश चव्हाण उप विभागीय अधिकारी, उत्तम तुरंबेकर उप विभागीय अधिकारी, किशोर साळगावकर, राजू सावंत प्रभावळकर, प्रसाद कापडोसकर आदी उपस्थित होते.










