महात्मा गांधी ही एक फक्त व्यक्ती नसून विचारधारा : प्रा अरुण मर्गज

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 30, 2026 16:06 PM
views 18  views

कुडाळ : "महात्मा गांधी एक नुसती व्यक्ती नाही तर  ती विचारधारा आहे. ते तत्त्व आहे. ते जीवनमूल्य आहे. त्याचा अहिंसावाद नुसता वैचारिक वाद नाही तर जगाला प्रेम अर्पावे असा संदेश देणारा, जगाला आदर्शभूत असा गांधीवाद आहे.शस्त्र सज्ज जगताला विनाशापासून वाचवू शकणारा आजच्या काळाची गरज असलेला तो अहिंसावादाचे शिकवण देणारा महामंत्र आहे. असे उद्गार प्रा अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते . त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये जगाला भारताला आदर्शभूत असणाऱ्या महात्मा गांधी सारख्या आदर्शभूत व्यक्तींची चरित्र त्यांच्या जीवन मूल्यांची विचारांची ओळख आजच्या पिढीला व्हावी या उद्देशाने त्यांच्या स्मृतिदिनाला फार महत्त्व आहे..  आणि असे स्मृतिदिन बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये साजरे केले जातात. थोर, महान नेत्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातात. ती अतिशय समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे ;की जी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक आणि पूरक ठरू शकेल. विद्यार्थ्यांनी अशा महान नेत्यांच्या जीवनदर्शनातून स्वतःला घडवायचं असतं. त्या दृष्टीने हा स्तुत्य उपक्रम आहे.

विशेष म्हणजे या दिवशी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांतर्फे सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करून महात्मा गांधीचा स्वच्छतेचा संदेश घराघरांमध्ये, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जातो. ही एक समाधानाची बाब आहे. असे म्हणत महात्मा गांधीच्या पवित्र स्मृतीस सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत  अभिवादन केले. विद्यार्थ्यानी सुद्धा त्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, पल्लवी कामत, रोहिदास राणे,प्रिया केटगाळे, वैजयंती नर   व विविध विभागाचे शिक्षक वृंद विदयार्थी उपस्थित होते.