
सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था ही जिल्ह्यातील नावलौकिक प्राप्त केलेली शैक्षणिक संस्था आहे. समाजकार्य करणाऱ्या व्यक्तिंना समाजभूषण पुरस्कार आणि चांगले अध्यापन करून विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना यश मिळवून देणाऱ्या शिक्षकांना उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारी संस्था आहे. सध्या ग्रामीण भागात शाळा चालविणे कठीण आहे. विद्यार्थानी नोकरी मिळेल व आपले आयुष्य उज्ज्वल होईल असे शिक्षण मुलांंनी घ्यावे असे उद्गार युवराज लखमराजे भोंसले यांनी नेमळे विद्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक व पुरस्कार वितरण सोहळ्यात काढले
नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ यांनी श्रीमंत युवराज लखमराजे भोंसले यांचा शाल ,श्रीफळ,बुके देऊन सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते कै. तात्यासाहेब पोकळे आदर्श समाजभूषण पुरस्कार सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते हणमंत देसाई उर्फ अण्णा देसाई यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल श्रीफळ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै. ज.भा.पेंढारकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वजराट नं. १ (ता. वेंगुर्ला) उपक्रमशील शिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना प्रदान करण्यात आला. कै. प्रमिला शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उपक्रमशील आदर्शशिक्षिका पुरस्कार जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा सरस्वती विद्यालय कालेली १ (ता. कुडाळ) मधील सौ. शामल चंद्रकांत धुरी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच यशप्राप्त विद्यार्थांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच दहावीतील विद्यार्थी आदित्य परब,भार्गवी आळवे व बारावीतील विद्यार्थी सर्वेश होडावडेकर,निधी धुरी यांची आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थीनी म्हणून निवड केली.
"संस्थेच्यावतीने दिले जाणारे हे पुरस्कार काटेकोरपणे मूल्यमापन करुनच हे दिले जातात. चंदनाप्रमाणे झिजून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तिंना हा समाजभूषण' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ यांनी काढले. यावेळी समाजभूषण पुरस्कार प्राप्त हणमंत देसाई, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तेजस बांदिवडेकर आदर्शशिक्षिका सौ. शामल धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मुख्यकार्यकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर सचिव स.पा.आळवे, तुकाराम गुडेकर, आनंद नेमळेकर, महादेव राऊळ, श्रीकृष्ण म्हाडेश्वर, केंद्रप्रमुख विठ्ठल तुळसकर, केंद्रप्रमुख चंद्रकांत धुरी, रवळनाथ पाटील, रवी घोगळे, सुभाष धुरी, रामचंद्र जाधव, एकनाथ आरोलकर, उमेश राऊळ सदानंद पेंडसे, एम.पी. सारंग, चंद्रकांत बंगाल, क्रांती मयेकर, नेहा कोंडये, दिलीप मेस्त्री, तुकाराम घोगळे, सगुण नेमण, कासार मॅडम उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य आर. के. राठोड यांनी केले, अहवाल वाचन राजेश गुडेकर यांनी केले.सन्मानपत्रांचे वाचन पांडूरंग दळवी, नितिन धामापूरकर व श्रीम. बरागडे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले, आभार लवू जाधव यांनी मानले










