
मालवण : मालवण कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या स्वयंपाक घरातील फ्रिजचा स्फोट झाल्याची घटना आज सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज झाल्यावर बिलये कुटुंब व नजीकचे ग्रामस्थ हादरून गेले. सुदैवाने कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या घरात त्याची पत्नी मीना आई सुमित्रा आणि त्यांच्या दोन्ही मुली कावेरी मधुरा या राहतात. आज स्वयंपाक घरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाला. यावेळी हे सर्व मध्य हॉल मध्ये झोपी गेले होते. स्फोट झाल्याचा कानठिळ्या बसणारा आवाज झाल्यावर बिलये कुटुंब हादरून गेले. त्यांनी नजीकच्या ग्रामस्थांना पाचारण केले. त्यानंतर घरातील पाण्याच्या सहाय्याने फ्रिज मधील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.










