
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजगांव जिल्हा परिषद मतदार संघातील माजगाव, चराठा, ओटवणे, वेत्ये, सोनुर्ली आणि सरंबळे या गावातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या पक्षातील सर्व कार्यकार्त्यांची एकत्रित बैठक सिद्धीविनायक हॉल - पोपकर, भटवाडी माजगाव, तालुका सावंतवाडी येथे गुरुवार २९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या मेळाव्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना नेते अशोक दळवी इत्यादी नेते तसेच महायुतीचे जिल्हा परिषद माजगाव मतदार संघाचे उमेदवार विक्रांत सावंत, पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे व सौ. उत्कर्षा उमेश गावकर पंचायत समिती - चराठा मतदार संघ हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या मित्र मंडळीसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.










