
सावंतवाडी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्तबगार नेते होते महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखले जात असे त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका कर्तबगार नेत्याला मुकला आहे अशा शब्दात अजित पवार यांचे एकेकाळचे सहकारी तथा कौटुंबिक स्नेही माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी श्रद्धांजली वाहिली त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे माझ्या मित्राला मी गमावलं आहे याचे मला अतिव दुःख होत आहे असे भोसले म्हणाले विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले हे वृत्त आम्हाला क्लेशदायक असेच आहे अजित पवार हे माझे सहकारी आणि कौटुंबिक स्नेही होते शरद पवार आणि माझ्या मधला ते दुवा होते महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात त्यांचा मोठा वाटा होता ते कर्तबगार नेते आणि विकास पुरुष होते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातही त्यांचा वाटा होता जिल्ह्याची राजधानी उभारण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिले होते मी राजकारणात कायम टिकावे यासाठी त्यांचा प्रयत्न होता त्यांनी मला भावाप्रमाणे साथ दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची त्यांची क्षमता होती आणि ते नक्कीच मुख्यमंत्री बनणार होते परंतु काळाने त्यांच्यावर दुर्दैवी घाला घातला त्यांचे निधन दुःखदायक असेच आहे चिरशांती लाभो अशीच प्रार्थना परमेश्वराकडे व्यक्त करतो अशी भावना प्रवीण भोसले यांनी व्यक्त केली.










