
सावंतवाडी : बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आज माघार घेतली. यामुळे माजी सभापती, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रमोद कामत बिनविरोध झालेत. माघार घेतल्यानंतर पालकमंत्री नितेश राणेंची श्री. पांगम यांनी सदिच्छा भेट घेतली.
बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून सुशांत पांगम यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे माजी सभापती तथा भाजपचे उमेदवार प्रमोद कामत बिनविरोध निवडून आले. तालुक्यातून ते एकमेव बिनविरोध निवडून येणारे उमेदवार ठरलेत. माघार घेतल्यानंतर कणकवली येथील निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणेंची श्री. पांगम यांनी सदिच्छा भेट घेतली. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रेमापोटी आपण माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री नितेश राणेंनी नक्की दखल घेणार असा शब्द पांगम यांना दिला. यावेळी गुरु सावंत, अर्चना पांगम, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते.










