भटवाडीतील स्वच्छतेसाठी सूचनाफलक

Edited by: विनायाक गांवस
Published on: January 23, 2026 16:26 PM
views 34  views

सावंतवाडी : शेखर सुभेदार मित्रमंडळ व  भटवाडी ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने भटवाडीतील स्वच्छतेसाठी विविध ठिकाणी स्वच्छता विषयक सूचनाफलक लावून स्वच्छ व सुंदर भटवाडी हा संदेश दिला. भटवाडी येथील नागरिकांना निरोगी आरोग्य मिळण्यासाठी हा उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येत आहे.  ढोरे पाणंद, चंद्रभागा तळी, कोळंबेकर परिसर व विद्यालय व शैक्षणिक व धार्मिक स्थळे या ठिकाणी कोणीही कचरा किंवा चालत्या गाडीतून कचऱ्याच्या पिशव्या टाकताना आढळला तर तो परिसर त्या व्यक्तीकडून स्वच्छ करून घेतला जाईल असा ठराव मांडला आहे. या ठरावाचे  कौतुक होत आहे.