
सावंतवाडी : नुकतीच ६८ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा भोपाळ व दिल्ली येथे पार पडली या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 12 नेमबाजांची महाराष्ट्र संघातून निवड झाली होती. त्यातील तीन खेळाडूंची ट्रायल्स साठी निवड झाली तर सहा खेळाडूंनी रिनॉन शूटर हा सन्मान मिळविला. यात शिवम नरेंद्र चव्हाण (सावंतवाडी) यांने 10 मीटर एअर रायफल प्रकारात 607 गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली तर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेली कु.अवनी मेघश्याम भांगले (सावंतवाडी ) हिने एअर पिस्तूल प्रकारात 532 गुण व कु. राजकुमारी संजय बगळे ( कुडाळ ) हिने 530 गुण मिळवून चांगली कामगिरी केली. या तिघांची निवड ट्रायल्स साठी झाली आहे. पहिली व दुसरी ट्रायल रायफल साठी पुणे व पिस्तूल च्या दिल्ली येथे होत आहेत. त्याच बरोबर 6 नेमबाज रिनॉन शूटर झाले त्यात कु. प्रतीक्षा प्रशांत सावंत हिने 25 मी. 0.22 पिस्तूल प्रकारात सहभाग घेऊन 524 गुण मिळविले तर 10 मी.एअर पिस्तूल प्रकारात कु. परशुराम तिळाजी जाधव (सावंतवाडी) 600 पैकी 535 गुण, कु.स्वामी समर्थ संजय बगळे (कुडाळ) 520 गुण,10 मी. पीप साईट प्रकारात कु.गौरव दत्तप्रसाद आजगावकर (वेंगुर्ला) 603.4 गुण, कु. हंसिका आनंद गावडे (मोरे) 600.4 गुण आणि कु, निलराज निलेश सावंत (सावंतवाडी) 602 गुण मिळवून चांगली कामगिरी केली.
हे सर्व खेळाडू उपरकर शूटिंग अकॅडेमी सावंतवाडी व वेंगुर्ला येथे नेमबाजीचा सराव करत आहेत. त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण मिळाले तसेच नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार विक्रम भागले यांचे मार्गदर्शन लाभले.










