
सावंतवाडी : JCI सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 26 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी ५ वाजता सावंतवाडी येथील राजवाडा येथे होणार आहे. या निबंध स्पर्धेत इयत्ता 6 वी ते 10 वी तसेच 11 वी ते 12 वी अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. स्पर्धेसाठी भारतीय संविधान – जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, तिरंगा ध्वज – अभिमानाचे प्रतीक, प्रजासत्ताक दिन – लोकशाहीचा उत्सव, संविधान – भारताचा आत्मा तसेच प्रजासत्ताक दिन आणि आजच्या तरुणांची भूमिका असे विषय देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी यापैकी कोणताही एक विषय निवडून निबंध लिहायचा आहे. निबंधाची शब्दमर्यादा 1200 शब्दांपर्यंत ठेवण्यात आली असून निबंध स्वच्छ व सुबक अक्षरात हस्तलिखित असावा. निबंधावर विद्यार्थ्याचे नाव, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी निबंध 23 जानेवारी 2026 पर्यंत संबंधित शिक्षकांकडे जमा करावेत, असे आयोजकांनी कळविले आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट निबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, संविधानिक मूल्ये व राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी JC मिस्बा शेख यांच्याशी 9833142888 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन JCI सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.










