
सावंतवाडी : सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम मानला जातो. सूर्यनमस्काराने आपले शरीर मजबूत व सुदृढ बनतेच त्याच बरोबर ही उपासना म्हणून केल्यास बुद्धीचे तेज प्रचंड वाढते विचार सात्विक होतात. म्हणून, सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पतंजली परिवार सिंधुदुर्ग कडून करण्यात आले आहे. १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करणाऱ्या सहभागी व्यक्तींना पतंजली परिवाराकडून एक मोठ्या कार्यक्रमात सहभागाचे प्रशस्तीपत्र दिले जाणार असून नाव नोंदणी केल्यावर व्हाट्सएप ग्रुप तयार करून २३ व २४ जानेवारी रोजी सकळी ६ ते ७ या वेळेत सराव वर्ग ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ ते ७:३०वाजता, रविकमल हॉल नवीन बस स्थानकाच्या जवळ हायवे नजीक कुडाळ येथे सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमा नंतर संस्थेकडून अल्पोपहार दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारत स्वाभिमान न्यास ,पतंजली योग समिती,युवा भारत,किसन सेवा समिती ,सोशल मीडिया ,महिला पतंजली योग समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांनी केले आहे.या कार्यक्रमासाठी संपर्क व नावनोंदणी साठी मोबाईल क्रमांक डॉ प्रशांत परब - ९६७३३७२४८५ श्री योगेश गवंडे - ९४२२३८१८८६ श्री प्रमोद नाईक - ९४२२०७६८९८,श्री जी . डी सावंत - ९८२३५५६५५८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन विद्याधर पाटणकर, जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांनी केले आहे.










