प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच यशश्री सौदागर यांना निमंत्रण

Edited by: विनायाक गांवस
Published on: January 23, 2026 16:07 PM
views 9  views

सावंतवाडी : पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकारकडून दिल्ली कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रामधून  सोळा जिल्ह्यातील १६ सरपंच यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.  त्यांच्यासोबत महाराष्ट्र पंचायत राज विभागाचे दोन नोडल अधिकारी  सोबत असणार असून त्यांचे २४ जानेवारी ते २६ जानेवारी नवीन महाराष्ट्र सदन येथे वास्तव्य असून २५ जानेवारी सकाळी पंतप्रधान  संग्रहालय येथे भेट. त्यानंतर २५ जानेवारी सायंकाळी  ७:०० वाजता पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय कडून "ग्राम सर्वोदय मासिकाचे"  प्रकाशन त्यानंतर देशपातळीवरील स्पर्धेची पारितोषिक वितरण कार्यक्रम सन्माननीय पंचायत राज केंद्रीय मंत्री  यांचे कडून होणार आहे. २६ जानेवारीला कर्तव्य पथ ,दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्यास उपस्थिती असा नियोजित कार्यक्रम होणार असून सौदागर यांना निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.