
सावंतवाडी : शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने उत्तम यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी एकूण २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ग्रेड ‘ए’ मध्ये ४ विद्यार्थी, ग्रेड ‘बी’ मध्ये ६ विद्यार्थी तर ग्रेड ‘सी’ मध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण १६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये ग्रेड ‘ए’ मध्ये २ विद्यार्थी, ग्रेड ‘बी’ मध्ये ६ विद्यार्थी आणि ग्रेड ‘सी’ मध्ये ८ विद्यार्थी यशस्वी ठरले. विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










