
सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. माजगाव स्वयंभू महादेव मंदिर, श्री देवी सातेरी मंदिरात नतमस्तक देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे.
भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आज सकाळी माजगाव येथील देवस्थानांत जात आशीर्वाद घेऊन तसेच माजी मंत्री, स्व. भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात केली. घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केला. यावेळी स्व. भाईसाहेब सावंत, स्व. विकास सावंत यांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहोत. आजचा प्रचाराचा नाही तर गावाच्या विकासाचा शुभारंभ असल्याची भावना श्री. सावंत यांनी व्यक्त करत पक्षातील नेत्यांचे आभार मानले. तसेच माजगाव, सोनुर्ली, वेत्ये, चराठे, ओटवणे, सरमळे ग्रामस्थ आपल्याला आशीर्वाद देतील असा विश्वास व्यक्त केला.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शिवसेना नेते अशोक दळवी, पंचायत समिती उमेदवार सचिन बिर्जे, माजगाव सरपंच रिचर्ड डिमेलो, आर.के. सावंत, संजय कानसे, ॲड. शामराव सावंत, सी.एल. नाईक, चंद्रकांत सावंत, अमोल सावंत, प्रा. बाळासाहेब नंदिहळ्ळी, अखिलेश कानसे, पी.ए. सावंत, श्री. गवंडी, शुभम रेडकर, ऋतिक कोरगावकर, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










