
कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कुडाळ येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण पुष्पांजली वाहिली. बाळासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत, त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला कुडाळमधील 'उबाठा' शिवसेनेचे प्रमुख शिलेदार उपस्थित होते. यामध्ये अमरसेन सावंत, राजन नाईक, कृष्णा धुरी, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, सतीश कुडाळकर, गजा परब यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.










