शिक्षक समितीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत आराध्य राणे प्रथम

जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 23, 2026 16:03 PM
views 10  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित पूर्व उच्च प्राथमिक जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जामसंडे नं.१ ता.देवगड चा विद्यार्थी कु.आराध्य दिनेश राणे (२८२ गुण) याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शिक्षक समिती सिंधुदुर्ग मार्फत दरवर्षी इ.५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा मोफत घेण्यात येते.

यावर्षीही ही परीक्षा जिल्ह्यातील १४४ केंद्रांवर सुरळीत पार पडली.या परीक्षेतून सिंधुदुर्ग जिल्हा टॉप टेन यादी जाहीर करण्यात आली आहे.सदर टॉप टेन यादीतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.द्वितीय क्रमांक- कु.आराध्य अमोल आपटे,सावंतवाडी नं.२ (२७६ गुण),तृतीय क्रमांक- कु.पियुष विजय लाड,नेरूर शिरसोस,ता.कुडाळ (गुण २६४),चतुर्थ क्रमांक- कु.उर्वी दत्तात्रय आठलेकर,सावंतवाडी नं.४ (गुण २६४),पाचवा क्रमांक- कु.राजनंदिनी चंद्रशेखर सावंत,सावंतवाडी नं.४ (गुण २६०),सहावा क्रमांक- कु.वृंदा विलास आवडण- आरोंदा नं.१,ता.सावंतवाडी (गुण २६०),सातवा क्रमांक-कु.स्वरा परशुराम गुरव,असगणी नं.१,ता.मालवण (गुण २५४),आठवा क्रमांक-कु.दिपश्री दिपेश सावंत, इन्सुली नं.५,ता.सावंतवाडी (गुण २५२),नववा क्रमांक-कु.यश संजय परब-वजराट नं.१,ता.वेंगुर्ले (गुण २५०),दहावा क्रमांक-कु.सई शिवाजी आरेकर,सावंतवाडी नं.२ (गुण २५०) टॉप टेन यादीतील गुणवंत विद्यार्थी यांना लवकरच जिल्हास्तरीय कार्यक्रमात गौरविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी सांगितले आहे.