
सावंतवाडी : रोणापाल - शेर्ले -निगुडे - सोनुर्ली मार्गावर प्रवास करताना सावधानता बाळगुनच प्रवास करा असं आवाहन करण्यात आलं आहे. या रस्त्याच्या बाजूलाच भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या आढळून आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार घोडेमुख मुख्य रस्त्यावर घडला होता. एक दुचाकी स्वार रात्रीच्या वेळेत आपल्या घरी परत येत असताना, रस्त्याच्या बाजूला असलेल्या बिबट्याने या दुचाकी स्वाराचा पाठलाग केला होता.
ही घटना ताजी असतानाच रोणापाल - शेर्ले -निगुडे - सोनुर्ली मार्गावर हा बिबट्या दिवसा ढवळ्या दिसत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.










