
कणकवली : देवगड तालुक्यातील संगीता प्रभू या रुग्णाला ए निगेटीव्ह रक्ताची गरज होती. सिंधु रक्तमित्र कणकवली कार्यकारिणी उपाध्यक्ष रुजाय फर्नांडिस यांनी गायत्री युवा प्रतिष्ठान कलमठ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदान केले. या रक्तदानामुळे संगीता प्रभू यांच्यावरील उपचार सुलभ झाले. रुजाय यांनी आतापर्यंत तब्बल १९ वेळा रक्तदान केले आहे. त्यांनी २ वेळा प्लेटलेटदान करून रुग्णांना जीवदान दिले आहे. त्यांच्या कार्यबद्दल त्याचे स्तरातून कौतुक केले जात आहे. रूजाय फर्नांडिस यांचा सामाजिक कार्यात सहभागी असतो. संस्थांशी संलग्न होऊन अनेकांना असलेली रक्ताची गरज पूर्ण केली आहे. त्यांनी गोवा - बांबोळी, कोल्हापूर, एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अनेकदा रक्तदान केले आहे.










