वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव ३ फेब्रुवारीपासून

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 18, 2026 12:22 PM
views 23  views

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ३३ वा कै. मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव ३ फेब्रु ते ९ फेब्रु २०२६ ला आयोजित केला आहे. रंगभुमीवरील दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार आहे. कणकवली सारख्या छोटयाशा भागात गेली ४८ वर्षे नाथ पै. एकांकिका स्पर्धा, ३२ वर्षे कै. मच्छिंव कांबळी स्मृती नाट्य उत्सब व २६ वर्षे पं. जितेंत्र अभिषेकी त्रिसूत्री शास्त्रीय संगीत महोत्सव, आयोजित करित आहे. यावर्षी कै. मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सवाचे ३३ वे वर्ष आहे. संस्था भारतीय रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांचा नाटयउत्सव आयोजित करत आहे. या कालावधीत भारतातील प्रमुख रंगकर्मीनी या महोत्सवात आपले नाट्यप्रयोग सादर केले आहेत. गिरीश कर्नाड, अमोल पालेकर, नसरुद्दीन शहा, रत्ना पाठक, विनोद पावा, हविय तन्वीर, रोहिणी हट्टगंडी, डॉ. श्रीराम लागू, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर, सुलभा देशपांडे, अतुल पेठे, डॉ. मोहन आगाशे, रतन थ्थीयाम् ते आजच्या आघाडीचे अमृता सुभाष, मुक्ता बर्वे, संदेश कुलकर्णी, श्री. दत्ता पाटील, श्री. आशुतोष पोतदार, प्राजक्त देशमुख अशा आणि अनेक लेखक कलाकार दिग्दर्शक यांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे.

या वर्षी आजचे आघाडीचे नाट्यकर्मी सुप्रसिद्ध नाटय अभिनेता गिरीश कुलकर्णी, उमेश जगताप, ओंकार गोवर्धन, गीतांजली कुलकणी, पर्ण पेठे, योगेश्वर वेद्रे, कल्पेश समेळ, अजित सावळे यांचे कणकवलीच्या नाटय उत्सवात आपले नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तसेच आघाडीचे लेखक हर्षवर्धन श्रोत्री, दत्ता पाटील, प्रा. प्रविण भोळे, अजित साबळे यांच्या नाट्य कलाकृती सादर करणार आहेत. त्यानुसार दिनांक ३ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा नाट्य उत्सब आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक ३ फेब्रुवारी महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांचे "होल बॉडी मसाज" दिनांक ४ फेब्रुवारी आविष्कार मुंबई यांचे "गोळकोंडा डायमंड्स" दिनांक ५ फेब्रुवारी सोशल मंच व टायनी टेल्स थिएटर "तुझी औकात काये", दिनांक ६ फेब्रुवारी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ललित कला केंद्र, नाशिकचे "इथेच टाका तंबू" दिनांक ७ फेब्रुवारी शून्य पुणे "पोकळ बासा" दिनांक ८ फेब्रुवारी ललित कला केंव पुणे यांचे "लेखा जोखा" दिनांक ९ फेब्रुवारी भद्रकाली प्रोडक्शन्स, मुंबई आज रंगभुमीवर गाजत असलेले "करुणाष्टके" या नाट्यप्रयोगाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.

आज रोजी मराठी रंगभुमीवरील दखल पात्र व लक्षवेधी नाटकांचा महोत्सव संस्था गेली ३२ वर्षे आयोजित करत आहे. कणकवली नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हयातील नाटय रसिकांसाठी हा महोत्सव एक पर्वणीच असते नाट्यप्रयोग व तद्नंतर कलाकारांसोबत नाटय रसिकांचा स्वाद-संवाद हे या महोत्सवाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. पुणे मुंबई मर्यादित असलेले नाट्यप्रयोगांचे आयोजन संस्था कोकणातील नाटय रसिकांसाठी करीत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सहकार्यवाह सीमा कोरगांवकर (मोबा. नं.

९४२२३८१९७५/८३२९३६१८६३) यांच्याशी संपर्क साधावा व या महोत्सवास सर्व नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा. असे आव्हान संस्थेच्यावतीने कार्याध्यक्ष अॅड. एन. आर. देसाई व कार्यवाह श्री. शरद सावंत यांनी केलं आहे.