कनकनगरमधील प्रलंबित कामे मार्गी लावणार

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 18, 2026 12:08 PM
views 28  views

कणकवली :  कणकवली शहरातील जनतेने मला दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी बसविले या संधीचे सोनेकरे. कनकनगर परिसरातील प्रलंबित असलेली कामे मार्गी लावणार, अशी ग्वाही नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.  कनकनगर येथील श्री महापुरुष मंदिरात कनकनगरवासीयांतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर, सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गटनेते रुपेश नार्वेकर, नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, बाळू पारकर, जाई मुरकर आदी उपस्थित होते. 

संदेश पारकर यांनी कनकनगर वासियांचे आभार मानले. प्रभागाच्या विकासासाठी नेहमी कार्यतत्पर राहणार, मूलभूत सोयी सुविधा या येत्या पाच वर्षांत देण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रभागात गेली अनेक वर्षे काही कामे प्रलंबित आहेत ती कामे तुमच्या सहकायार्तून लवकरच मार्गी लावणार, असा विश्वास पारकर यांनी दिला. सुशांत नाईक म्हणाले, कनकनगरवासियांचे मी आभार मानतो तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे व पाठिंब्यामुळे उपनगराध्यक्षपदाचा मान मिळाला. कनकनगरच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार व येत्या काळात तुमच्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कनकनगर प्रभागातील प्रलंबित प्रश्न आपण मार्गी लावू,असा ठाम विश्वास त्यांनी दिला. 

यावेळी सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, बाळू पारकर, जाई मुरकर यांचा कनकनगरवासीयांनी सत्कार केले. मंदिरात ब्राम्हण भोजन समारंभ संपन्न झाले. यनिमित्त विधीवत पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री सुस्वर भजने असे विविध कार्यक्रम पार पडले. नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.