
सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधील एनसीसी आर्मी कॅडेट्स आर्य दिनेश गावडे व प्रणव भालेकर यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली. त्याचबरोबर महाविद्यालयातील अविष्कार शरद डीचोलकर व गणेश अरुण गावडे याचीसुद्धा भारतीय सैन्यदलामध्ये 'अग्नीवीर' साठी निवड झाली. यानिमित्ताने आर्य दिनेश गावडे व अविष्कार शरद डीचोलकर यांचा सत्कार नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हे यश लाभले. संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, युवराज्ञी उर्वशीराजे भोंसले, संचालक प्रा.डी. टी.देसाई यांनी अभिनंदन केले आहे.उद्याच ते प्रशिक्षणासाठी त्यांना दिलेल्या प्रशिक्षण स्थळी रवाना होत आहेत.याप्रसंगी संस्थेचे संचालक ॲड. शामराव सावंत, डॉ.सतीश सावंत व श्री. जयप्रकाश सावंत, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल.भारमल, एनसीसी आर्मी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. सचिन देशमुख, महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी , एनसीसी कॅडेट्स, व सर्व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.










