विषारी द्रव्य प्राशनाने तरुणाचा मृत्‍यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: January 16, 2026 19:54 PM
views 116  views

कणकवली : तालुक्‍यातील ओझरम - माळवाडी येथील दत्तात्रय बापू वरक (वय ३८) यांचा शुक्रवारी जिल्‍हा रूग्‍णालय ओरोस येथे उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाला. दत्तात्रय वरक यांनी गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. परिणामी ते बेशुद्‍ध पडले. त्‍यांना नातेवाईकांनी तातडीने कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्‍याने त्‍यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्‍हा रूग्‍णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना पहाटे साडे चारच्या सुमारास त्‍यांचा मृत्‍यू झाला. याबाबतची खबर रामचंद्र महादेव वरक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्‍यानुसार आकस्मिक मृत्‍यू अशी नोंद करण्यात आली आहे.