भाजप - शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा कुडाळमध्ये जल्लोष

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 16, 2026 20:01 PM
views 29  views

कुडाळ : मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर कुडाळ येथे आज भाजप व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. येथील भाजप कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष केला. यावेळी बंड्या सावंत, नगरसेवक उदय मांजरेकर व निलेश परब, शहराध्यक्ष सुनील बांदेकर, रूपेश पावसकर, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, राजू बक्षी, विजय कांबळी, गुरूनाथ दामले, दाजी सावंत, विशाखा कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान शिंदे शिवसेनेच्या कार्यालयासमोरही शिवसैनिकांनी फटाके वाजवत आनंद व्यक्त केला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, नागेश परब, राम बांदेलकर, विनायक घाडी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.