
सावंतवाडी : डॉ. प्रमोद नाईक यांच्या पत्नी प्रा. डॉ. नीलम नाईक, यांनी लिहिलेलं लाल मातीतल्या महान सुपुत्रांची चरित्रगाथावर आधारित लेखन केलेलं "कोकणरत्ने" हे पुस्तक या आधी विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव प्रशालेच्या विद्यार्थांना भेट म्हणून देण्यात आली होती.
डॉ. प्रमोद नाईक यांनी लेखन केलेल "महाराष्ट्र रत्ने" हे पुस्तक आजगाव विद्या विहार प्रशालेच्या विद्यार्थांना मुख्याध्यापक उत्तम भागीत व शिक्षकवर्ग यांच्या उपस्थित भेट म्हणून देण्यात आल.यावेळी मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी डॉ. प्रमोद नाईक व त्यांच्या पत्नी प्रा. नीलम नाईक यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत सदरील पुस्तके ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. हे पुस्तक म्हणजे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक इतिहासाचा अभ्यासक, कोकणात जन्मलेल्या, कोकणाचा अभिमान असलेल्या आणि कोकणच्या सुपुत्राबद्धल कुतूहल असलेल्या प्रत्येकानं वाचण्यासारखं ही पुस्तक असल्याचे डॉ. प्रमोद नाईक यांनी सांगितले. डॉ. प्रमोद नाईक हे आरोंदा गावचे सुपुत्र असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण हे तांबुळी व आजगाव येथे झाले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातून सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पी एच डी मिळवलेली आहे. डॉ. प्रमोद नाईक हे विविध क्षेत्रात समाजपयोगी काम करत असून त्यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी असल्याने त्यांच्या कार्याबद्दल प्रशालेच्या वतीने शिक्षकांनी, विद्यार्थी, पालकांनी ऋण व्यक्त केले आहे.










