
सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री पांडुरंग काकतकर यांचा त्यांच्या विज्ञान विषयातील योगदानाबदद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डी.टी. देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डि.एल.भारमल, विज्ञान विषयांचे विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग , शिक्षकेतर कर्मचारी , व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष श्री पाडुरंग काकतकर यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले. ज्या ज्या वेळी जिल्ह्यामध्ये विज्ञान मंडळाच्या स्पर्धा होतात, किंवा विविध कार्यक्रम होतात त्यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून एसपीके महाविद्यालयाचे शिक्षक उपलब्ध राहतात.
त्यामुळे विज्ञान मंडळास मार्गदर्शन मिळते. त्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. आपल्या भाषणामध्ये संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई असे म्हणाले की आजच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, त्यांना संगणक, तंत्रज्ञान, प्रयोग यांची सखोल माहिती मिळावी. तसेच तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातील संधी चा नक्कीच फायदा होईल. आज भारत देश हा शास्त्रज्ञांच्या सहकार्याने एक महान देश होत आहे. विद्यार्थ्यांनी जरूर याचा विचार करावा व आपले भावी आयुष्य घडावावे असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी विज्ञान प्रदर्शनाची सर्व माहिती दिली. या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ कसा घ्यावा तसेच भविष्यामध्ये याचा विद्यार्थ्यांनी काय लाभ होईल याचे सुतवाच केले. कार्यक्रमाच्या आरंभी डॉ. व्हि.पी. सोनाळकर यांनी प्रास्ताविक केले तर
सूत्रसंचालन डॉ. जी. एस. मर्गज यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.व्हि. पी.राठोड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सावंतवाडी व सावंतवाडी परिसरातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर विज्ञान प्रदर्शन हे दिनांक 9 जानेवारी व 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचा लाभ सर्व प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल यांनी केले आहे.










