
सावंतवाडी : सावंतवाडी येथील बसस्थानक व परिसरात सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. बसस्थानक येथे हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसरातील कचरा दुर करत परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोसले, नगरसेवक निलम नाईक, दुराली रांगणेकर, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, तौकिर शेख आदीसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोहीमेत सहभागी झाले होते.










