
सावंतवाडी : आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधीर व मतिमंद निवासी विद्यालयास बँक ऑफ इंडिया शाखा मळेवाड यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्यावतीने उपस्थित बँक ऑफ इंडियाचे शशांक पाटील, कर्मचारी प्रकाश तळवणेकर, ग्रामस्थ संतोष गावडे यांचे शाळेच्यावतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेच्यावतीने बँक ऑफ इंडियाचे आभार व्यक्त करण्यात आले.










