
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील चराठे येथील हेमांगी गजानन मेस्त्री हिने मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी तिचे अभिनंदन केले असून, पुढे दिल्ली येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.यावेळी चराठे गावच्या सरपंच प्रचिती कुबल, बाळू वाळके, राजू कुबल, गजानन मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमांगी मेस्त्रीच्या या उल्लेखनीय यशामुळे चराठे गावासह संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










