
सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानकातून सुटणारी सावंतवाडी सातोसे ही बस फेरी सातार्डा पर्यंत करुन शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोयी दूर करा, अशी मागणी आज उबाठा शिवसेनेच्या वतीने सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ते यांच्या वतीने आगारप्रमुख निलेश गावित यांच्याजवळ करण्यात आली. लवकरच या संदर्भात कार्यवाही करू असे आश्वासन श्री गावित यांच्याकडून देण्यात आले.
पारिपत्ये यांनी आज उबाठाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश रावळ उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुकाप्रमुख राजू शेटकर युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत आगारप्रमुख श्री गावित यांची भेट घेतली यावेळी सातार्डा ग्रामपंचायत सदस्य वासुदेव रावळ युवा सेनेचे योगेश गोवेकर सामाजिक कार्यकर्ते किरण प्रभू आधी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत श्री गावित यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली यामध्ये सावंतवाडी आगारातून दररोज दुपारी बारा वाजता सावंतवाडी ते सातार्डा असे बसपेरी सोडण्यात येते ही बस बांद्या मार्गे सातोसे गावापर्यंत येऊन पुन्हा परत सावंतवाडीला जाते. सातोसे तसेच सातार्डा या भागातून सावंतवाडी व बांदा या ठिकाणी कॉलेज व महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बस फायद्याची ठरते परंतु सातोसे मार्गेच ही बस फेरी पुन्हा परत जात असल्याने सातार्डा गावातील कॉलेज महाविद्यालय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना सातोसेमध्येच उतरावे लागते. यामुळे त्यांना पुढचा प्रवास खाजगी वाहने तसेच अन्य मार्गाने करावा लागतो याचा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागतो दुसरीकडे सातसे गावातील तलाठी कार्यालय रेशन धान्य दुकान आधी सर्व व्यवस्था सातार्डा या ठिकाणी असल्याने तेथील ग्रामस्थांना या बसचा फायदा होऊ शकतो या सर्व बाबींचा विचार करून सदरची बस ही सातोसे पर्यंत न सोडता सातार्डा पर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी श्री पारिपत्ते यांनी निवेदनातून केली आहे. श्री गावित यांनी सदर मागणीचा विचार करता लवकरात लवकर सदरची बस सातार्ड्यापर्यंत सोडण्यासाठी कार्यवाही हाती घेण्यात येईल असे आश्वासन दिले.










