
सावंतवाडी : लोककल्याण शिक्षण संस्था संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पारितोषिक वितरण कार्यक्रमात शाळेच्या प्रगतीसाठी 'मालवणी गजाली हस्तलेखन' विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत बनविलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रशालेचे माजी विद्यार्थी सुरेंद्र भोसले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी विद्यार्थी सुरेंद्र भोसले, सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन बाळकृष्ण शेणई, अध्यक्ष शाळा समिती विद्याविहार हायस्कूल रामचंद्र झांट्ये, आजगाव सरपंच यशश्री सौदागर , तिरोडा माजी सरपंच विश्वनाथ आडारकर , बँक ऑफ महाराष्ट्र चे यश दीक्षित, चिन्मय गोखले , शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष दिव्या काळोजी,हेमंत आडारकर, रिया मुळीक शिक्षक पालक संघ सदस्य ,निकिता केरकर पालक प्रतिनिधी ,ग्रामपंचायत सदस्य ज्योती आजगावकर, शिक्षक पालक संघ सदस्य गजानन काकतकर पालक प्रतिनिधी अनंत पांढरे, रवींद्र नाईक , बाळकृष्ण हळदणकर ,राम साटेलकर, वामन शेणई, शंकर साटेलकर, अवधूत राज्याध्यक्ष, यशवंत जाधव ,अमृतराव माळगे , एस वाय पाटील, आम्ही वर्ग मित्रचे दिनानाथ काळोजी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल ,श्रीफळ सन्मानचिन्ह,चाफा कलम, देऊन सन्मान करण्यात आला.तसेच कार्यक्रमाला उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली तसेच उपस्थित अतिथींचे खास वाद्यांच्या गजरात स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या मानसी परुळेकर, वार्षिक अहवाल वाचन काव्य साळवी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी केले.
यावेळी भोसले यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेले चित्रकला , विज्ञान, हस्तकला प्रदर्शन तसेच लेखन केलेल्या हस्तलिखिताची प्रशंसा करत,शाळेमार्फत राबविले जाणारे उपक्रम हे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहेत असे सांगितले.शाळेच्या प्रगतीसाठी आपण नेहमीच सहकार्य करणार असल्याचे सांगून भोसले यांनी प्रशालेला कार्यक्रमात दहा हजार रुपये आर्थिक मदत करत,पुढील काही दिवसांत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बोर्ड ची व्यवस्था करणार असल्याचे सांगून भोसले यांनी आपले वडील विजयराव भोसले यांच्या स्मरणार्थ दहा हजार रुपयांची कायम ठेव रक्कम देण्याचे जाहीर केले .या रक्कमेच्या व्याजातून शाळेतील विद्यार्थ्याना बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी भोसले यांनी आपल्या गुरुजनांबाबत,शाळेतील आठवणी ताज्या करत, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मागदर्शन केलं.आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांनी सुद्धा उपस्थित पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच ग्रामपंचायत स्तरावर आपण शाळेला मदत करणार असल्याचे सांगितले . मुलांनी आपल्या कल्पकतेचा पुरेपूर वापर करून ,सायन्स बाबत काढलेल्या रांगोळ्या , टाकाऊ पासून बनविलेल्या वस्तू याची त्यांनी प्रशंसा केली. सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन बाळकृष्ण शेणई यांनी सुद्धा आपल्या शाळेतील आठवणी ताज्या करत,मुलांनी कोणतेही संकट आलं तर घाबरायच नसत तर ते झेलण्याची तयारी ठेवावी. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकतो.मेहनत करा आणि उज्वल यश संपादन करा असा मोलाचा सल्ला त्यांनी देत शाळेसाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र झांट्ये यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देत,कार्यक्रमाची प्रशंसा केली.
कार्यक्रमात बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले .यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी उपस्थित मान्यवरांनी प्रशालेला सहकार्य केल्याबद्दलं सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन काव्या साळवी यांनी केले.यावेळी पालक, आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










