स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणारे माध्यम : वीरेंद्र ढवळीकर

Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2025 17:59 PM
views 26  views

सावंतवाडी : केवळ पुस्तकी ज्ञान न घेता जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी अष्टपैलू होणे गरजेचे आहे. वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणारे माध्यम आहे. मुलांनी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून आपला आत्मविश्वास वाढवावा त्यासाठी शिक्षक व पालकांनी त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. भविष्यात आपल्या गावातील कोणालाही गोवा मध्ये वैद्यकीय मदत किंवा काही मदत लागल्यास त्यासाठी मी सहकार्य करेन गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे एक वेगळे नाते आहे असे प्रतिपादन फोंडा गोवा चे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांनी केले. 

 विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलतं होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत, प्रमुख पाहुणे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा माजी उपसरपंच बाळू सावंत, इन्सुली गावचे सरपंच तात्या वेंगुर्लेकर वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, इन्सुली माजी सरपंच बाळू मेस्त्री, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे,  संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत, खजिनदार सदा कोलगावकर, सचिव गुरुनाथ पेडणेकर, उद्योजक साईप्रसाद राणे, उद्योजक सावेंदर कोहली, शिक्षक पालक संघांचे उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, संस्था संचालक आपा आमडोसकर,  अजय कोठावळे, महेंद्र पालव, सचिन दळवी, मयुर चराटकर, आनंद राणे, संजय राणे, अशोक गवस, प्रविण पेडणेकर, किरण गावडे, जयराम पालव, सल्लागार रघु्वीर देऊलकर, पोलीस पाटील जागृती गावडे,मुख्याध्यापिका सुविद्या केरकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे  उदघाटन वीरेंद्र ढवळीकर यांनी श्रीफळ वाढवून केले. तर दीपप्रज्वलन माजी सभापती प्रमोद कामत व बाळू सावंत यांनी केले.

 यावेळी बोलताना प्रमोद कामत म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक माध्यमिक विद्यालय बंद होण्याच्या स्थितीत आहेत. कमी होत असणारी पटसंख्या परिणामी शिक्षक संख्या कमी झाली. त्यात इन्सुली येथील विद्या विकास मंडळ. संचलित नुतन माध्यमिक विद्यालयाचे कौतुकास्पद काम दिसून येते. या गावात असलेल्या एकजुटीमुळे येथील पटसंख्या चांगली आहे.या गावात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम नुतन माध्यमिक विद्यालय करत असुन संस्थेने व प्रशालेने असेच काम करत रहावे माझे कायम सहकार्य राहील.  यावेळी  बांदा माजी उपसरपंच बाळू सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन सारखे कार्यक्रम होणे गरजेचे आहेत. गेली पन्नास वर्षे या शाळेने अनेक विद्यार्थी घडविले. या प्रशालेच्या शैक्षणिक यशाचा एक वेगळा इतिहास आहे. प्रशाळेच्या यशाचा आलेख असाच चढता राहो अशी श्री देवी माऊली चरणी प्रार्थना करतो. 

यावेळी नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, माजी सभापती प्रमोद कामत, माजी उपसरपंच बाळू सावंत व सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. उवस्थित सर्व मान्यवारांचे प्रशाळेचे सहा शिक्षक संजय शेवाळे यांनी पुष्पगुछ देत स्वागत केले. सचिव गुरुनाथ पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा शिक्षिका विदया पालव यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुविद्या केरकर यांनी तर आभार सहा शिक्षक संजय शेवाळे यांनी केले. या स्नेहसंमेलनाला पालक, व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सदर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.