
वैभववाडी : वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. बांधकाम सभापती पदी रणजित तावडे यांची पुन्हा वर्णी लागली आहे. तर शिक्षण आरोग्य सभापती पदी सुभाष रावराणे, महीला बालकल्याण सभापती सानिका रावराणे, उपसभापती सुंदराबाई निकम यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीकरिता प्रतिक थोरात यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीनंतर नुतन पदाधिकारी यांच अभिनंदन करण्यात आले.










