
सावंतवाडी : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भरघोस मतांनी मिळवलेला विजय हा जनतेच्या विश्वासाचा स्पष्ट कौल आहे. या यशाबद्दल कुडाळ, मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील सामाजिक व विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ, भूषण सारंग आदी उपस्थित होते.










