
दोडामार्ग : श्री बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कुडासे चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उद्या, मंगळवारी ३० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगक (गोवा) प्रभाकर राघोबा सडेकऱ असणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रविण लक्ष्मण देसाई, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष संदेश सिताराम तळणकर, सचिव, माजी विद्यार्थी संघ दत्ताराम रघुनाथ देसाई, जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल विभाग) रविंद्र विद्यानाथ भागवत,सहसचिव, समन्वय समिती नंदकुमार नारायण नाईक, शालेय समिती सदस्य प्रकाश आप्पा ठाकर, माजी सैनिक व सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सुगंध नारायण नरसुले, चीफ इंजिनिअर व मुख्य कार्यकारी अधिकारी (गोवा) दीपक पुंडलिक गवस, सरपंच ग्रामपंचायत कुडासे नम्रता नामदेव देसाई उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व विविध स्पर्धांमधील यशाबद्दल पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. वार्षिक स्नेहसंमेलन ‘स्वरांजली’ अंतर्गत सायंकाळी ७.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच, ग्रामपंचायत कुडासे नम्रता नामदेव देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापनाच्या वतीने व मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे यांनी केले आहे.










