
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्लसम्राट प्रतिष्ठान केलेले क्रीडा क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील कार्य इतरांना प्रेरणादायी असून त्यांचे मी कौतुक करतो. आगामी काळात संपूर्ण राज्याला हेवा वाटेल अशी आदर्शवत भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असून त्यासाठी क्रीडाप्रेमींनी एकत्र येऊन नियोजन करणे गरजेचे आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी जे जे सहकार्य लागेल ते सर्व आपल्याकडून नक्की होईल, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथे मेरा युवा भारत, सिंधुदुर्गचे कालिदास घाटवळ यांच्या मार्गदर्शनाखाली व मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव पैलवान ललित हरमलकर, मेरा युवा भारत, सिंधुदुर्गचे माजी स्वयंसेवक जयराम जाधव, अनुभव साथी सहदेव पाटकर, महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, मराठा अकॅडेमीचे संचालक बापू परब, आजगाव विद्यालयाच्या शिक्षिका काव्या साळवी यांसह अन्य उपस्थित होते. दरम्यान यावेळी सच्चिदानंद उर्फ संजू परब व तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते प्रारंभी मारुतीरायाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मैदानाला नारळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी देखील खेळाडूंना मार्गदर्शन केले श्री. पाटील म्हणाले की, स्पर्धेत जिंकणे किंवा हारणे महत्त्वाचे नसून आपले सर्वोत्तम योगदान देणे महत्त्वाचे आहे. जीवनात कोणत्याही स्पर्धेत आपला सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असून खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून आपल्या अंगी असलेले सर्वोत्तम कौशल्याचे प्रदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना मैदानावर कसे प्रदर्शन करावे?, याबाबत प्रात्यक्षिक देखील करून दाखविले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. कबड्डी स्पर्धा
प्रथम :- जय महाराष्ट्र
द्वितीय:- टीम महिंद्रा, खो खो स्पर्धा -
प्रथम :- टीम महेंद्रा
द्वितीय:- कळसुलकर टीम, 100 मिटर धावणे (मुलगे) -
प्रथम :- अविष्कार डिचोलकर
द्वितीय:- अंकुश पारधी, 100 मिटर धावणे(मुली)
प्रथम :- रामिता धुरी
द्वितीय:-अश्विनी तेली
तृतीय :- सानिया जाधव, गोळा फेक (मुले)
प्रथम :- देवा सावंत
द्वितीय:-अतुल बहादूर
तृतीय :-आपा हेर्लेकर, गोळा फेक (मुली)
प्रथम :- सुप्रिया सावंत
द्वितीय:-दीप्ती राणे
तृतीय :-भाग्यश्री पिरणकर असून
बक्षीस वितरण कार्यक्रमास पीएसआय माधुरी मुळीक यांची उपस्थिती. दरम्यान स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या दबंग पीएसआय माधुरी मुळीक उपस्थित होत्या. त्यांनी देखील खेळाडूंना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे मौलिक मार्गदर्शन केले.
स्पर्धेत पंच म्हणून तहसीलदार श्रीधर पाटील, अरुण भिसे, संभाजी म्हाडगुत, प्रा. रूपेश पाटील, पै. ललित हरमलकर, बापू परब यांनी काम पाहिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामाक्षी महालकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव ललित हरमलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जावेद शेख, उपाध्यक्ष रुपेश पाटील, नागेश सूर्यवंशी, सेक्रेटरी तथा संस्थापक ललित हरमलकर, कृष्णा हरमलकर, दशरथ गोंड्याळकर, बुधाजी हरमलकर, कुणाल परब, प्रसिद्धी प्रमुख साबाजी परब, आदित्य हरमलकर, देवेश पालव, कामाक्षी महालकर, दीपाली राऊळ, नेहा ढोले, श्रुती सावंत, भाविका कदम, फातिमा मकानदार, नासिर मकानदार, गौरव कुडाळकर, निहाल लाखे, फिजा मकानदार, मिताली राऊळ, संचिता केनावडेकर, सान्वी बिद्रे, सतीश हरमलकर, गणेश हरमलकर यांनी कठोर परिश्रम घेतले.










