
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी सायंकाळी लोककलांचा आविष्कार पाहायला मिळाला. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या केशवसूत साहित्य नगरीत होणाऱ्या या संमेलनात मुख्य कार्यक्रम रविवार २८ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. शनिवारी सायंकाळी काढलेल्या ग्रंथदिंडीत विविध विद्यालयांचे विद्यार्थी, आयोजन समितीचे पदाधिकारी, शिक्षक सहभागी झाले होते.
शनिवारी सायंकाळी आरपीडी हायस्कूलचा वारकरी जागर, आडाळी गावच्या महिलांच्या पारंपरिक फुगड्या, पिंगुळी येथील एकनाथ गंगावणे यांच्या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, रामायण, सीता स्वयंवर तसेच देवसू गावच्या महिलांच्या तसेच कारिवडे येथील गणपत परब यांच्या लोकगीतांचे सादरीकरण करण्यात आले. संमेलनात कविवर्य आ. सो. शेवरे ग्रंथ दालन असून त्यात कोल्हापूर येथील महाराष्ट्र शासन ग्रंथ भांडार-साहित्य संस्कृती मंडळ प्रकाशित ग्रंथ, कणकवली येथील विघ्नेश प्रकाशन, गोवा येथील विचार ग्रंथ दालन, तसेच सावंतवाडी येथील क्षितिज वितरणाचा स्टॉल आहे. या ग्रंथ दालनाचे उद्घाटन मान्यवरांचे असते रविवारी होणार आहे. साहित्य रसिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नीरजा, उद्घाटक डॉ. सुनील लवटे, माजी आमदार प्रवीण भोसले, स्वागताध्यक्ष प्राध्यापक प्रवीण बांदेकर, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर सचिव रमेश बोंद्रे कार्याध्यक्ष एडवोकेट संदीप निंबाळकर, बाळासाहेब बोर्डे कर, संचालिका डॉ. सुमेधा नाईक, सखी जाधव, राजेश मोंडकर, डॉक्टर गोविंद काजरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम, भरत गावडे, मधुकर मातोंडकर, कवी दादा मडकईकर, श्वेतल परब, स्मिता खानोलकर, मदर क्वीनच्या शकुंतला राऊळ, जानवी सावंत, अस्मिता परब, हर्षवर्धिनी जाधव, मनोहर परब, किशोर वालावलकर, विजय ठाकर, शालिनी मोहोळ, अभिनेते नंदू पाटील दानोळी विद्यालयाचे रोहन पाटील, विनया बाड, ग्रंथपाल महेंद्र पटेल, रंजना कानसे, महेंद्र सावंत आधी उपस्थित होते.दाणोली येथील बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयाच्या लेझीम पथकाने संमेलनात रंगत आणली. याशिवाय राणी पार्वती देवी हायस्कूलचे वारकरी पालखी सहभागी झाली होती.










