कुडाळातील बाव गावात बिबट्याचं दर्शन

ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण | प्रशासनाकडून दखल घेण्याची मागणी
Edited by: मेगनाथ सारंग
Published on: December 28, 2025 13:08 PM
views 152  views

कुडाळ : तालुक्यातील बाव गाव परिसरात बिबट्या दिसल्याची घटना समोर आली असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावालगतच्या शेती व जंगल परिसरात बिबट्याची हालचाल नागरिकांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. बिबट्या दिसल्याची माहिती सध्या वनविभागाला देण्यात आलेली नसल्याचे समजते. मात्र अचानक झालेल्या या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी आपापल्या पातळीवर सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळले असून लहान मुले व पाळीव जनावरे घरातच ठेवण्यात येत आहेत.

दरम्यान, गावकऱ्यांकडून या घटनेची चर्चा सुरू असून प्रशासनाकडे लवकरात लवकर याची दखल घेण्याची मागणी होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.