
देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे गावच्या लिशा तेलीने जिल्हा सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध क्रीडा प्रकारांत एक सुवर्ण व दोन रौप्य पदक पटकावून मुणगे हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी तिचे अभिनंदन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हिंदळे येथील लिशा दयानंद तेली हिने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत विविध क्रीडा प्रकारांत घवघवीत यश संपादन केले आहे. लिशा मुणगे हायस्कूल येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे, ओरस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत लिशाने आपल्या वेगवान धावण्याच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) तर १०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक (रौप्यपदक), तसेच लांब उडी द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) तिने प्राप्त केले, एकाच स्पर्धेत धावणे आणि उडी अशा दोन्ही प्रकारांत यश मिळवून लिशाने आपली क्रीडा क्षेत्रातील चमक दाखवून दिली आहे. तिच्या या यशाबद्दल सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले.
तसेच सर्व सहभगी विद्यार्थ्यांचे, तसेच मार्गदर्शक शिक्षक, यांचे मुणगे हायस्कूल या संस्थेच्या सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.










