
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ खालची धाटवाडी येथील विहिरीचे नूतनिकरण शुक्रवारी नगरध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम करून करण्यात आले. कसई दोडामार्ग मधील खालची धाटवाडी येथील सार्वजनिक विहीर नूतनिकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी नगरपंचायतच्यावतीने भूमिपुजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, माजी सरपंच यशवंत बागकर, माझी सरपंच प्रतिभा नाईक, नगरसेविका स्वराली गवस, नगरसेविका संजना म्हावळणकर, माझी ग्रामपंचायत सदस्य स्नेहप्रभा सावंत, सुमित म्हाडगुत, उदय गवस, रामदास बागकर, कल्पेश गवस, सगुण मुळगावकर, चंद्राकर खडपकर, साजन गवस, संदिप सावंत, विनायक खडपकर, माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर जितेंद्र गवस, विराज सावत, दिनकर उगवेकर ओंकार कोळेकर, दिपेश म्हाडगुत, प्रदीप नाईक, प्रभाकर सावंत व नगरपंचायत कर्मचारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.










