
कणकवली : वरवडे - बौद्धवाडी येथील प्रभावती राजाराम कासले (वय ७०) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वरवडे येथीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल कासले, सुनील कासले, संदीप कासले, वनिता कासले यांच्या त्या मातोश्री होत.










