परमेत युवतीची आत्महत्या

Edited by: लवू परब
Published on: December 26, 2025 19:55 PM
views 161  views

दोडामार्ग : राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन एका युवतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परमे गावात घडली. गौरी नंदकिशोर सुतार (१८ वर्षे) असे तिचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

राहत्या घरातील मधल्या चौकात असलेल्या सरीला ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत गौरीचा मृतदेह आढळून आला.  घरातल्या मंडळींनी लागलीच याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्या युवतीला खाली उतरवून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पोलिसांनी तिला मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ती कुडाळ येथील एका नर्सिंग कॉलेजला शिकत होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तिच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.