
सावंतवाडी : आनंदोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सवाने यशस्वीरीत्या ३ वर्षे पूर्ण केली असून नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोसले यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवराज लखमराजे सावंत भोसले, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
पौर्णिमा सावंत यांच्या माध्यमातून या आनंदोत्सवाच आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोसले यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. युवराज्ञींच्या हस्ते दीपप्रज्वलन व विक्रांत सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, विक्रांत सावंत यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
आजपासून २७ ते २८ डिसेंबर रोजी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दु. ३ ते १० या वेळेत हा महोत्सव असणार आहे. या महोत्सवात ज्वेलर्स, ड्रेस, मालवणी खाद्य पदार्थांसह विविध गोष्टींचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी मोठी गर्दी यावेळी केली होती. याप्रसंगी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, पौर्णिमा सावंत, रविकांत सावंत आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रणिता कोटकर यांनी केले.










