नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांना शिवराम दळवींनी दिल्या शुभेच्छा

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2025 18:33 PM
views 20  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोसले यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज माजी आमदार शिवराम दळवी यांनी त्यांची नगरपालिकेत भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर श्रद्धाराजे भोंसले यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलीत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार दळवी यांनी ही सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी शहराच्या विकासकामांबाबत आणि आगामी नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा केली. या प्रसंगी बाळू परब, रेमी आलमेडा यांसह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षांनी यावेळी सर्वांचे आभार मानले असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.