
सावंतवाडी : नव तरुण हौशी कलाकार ग्रुप व जगदगुरू नरेंद्राचार्यची संगीत आराधना तिरोडा शाखा आयोजित, शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी भवानी मंदिर जवळ तिरोडा भरडवाडी येथे गाव मर्यादित गायन व वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत मोठा गटसाठी प्रथम क्रमांक रुपये ३०००/-(सुरेंद्र भोसले यांजकडून)द्वितीय रुपये २०००/- ( डॉ. प्रसाद निखार्गे)तृतीय क्रमांक रुपये १०००/- ( शिवराम साळगावकर यांजकडून ) तर उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये ५००/- लहान गट _ हार्मोनियम वादन व गायन ,प्रथम क्रमांक रुपये ३०००/-(अमिता नाणोस्कर यांजकडून) द्वितीय क्रमांक रुपये २०००/-(विवेक आडारकर यांजकडून) तृतीय क्रमांक रुपये १०००/-(रेडी शाखा कडून) तर उत्तेजनार्थ ५००/- लहान गट पखवाज वादन, प्रथम क्रमांक रुपये ३०००/-(सुनील गाड यांजकडून)द्वितीय क्रमांक रुपये २०००/- (संदेश केरकर यांजकडून) तृतीय क्रमांक रुपये १०००/-(वैभव नाणोसकर यांजकडून) तर उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये ५००/- तसेच सर्व स्पर्धकांना सुनील पेडणेकर यांनी सन्मानचिन्ह तर प्रमाणपत्र केशव पेडणेकर यांनी पुरस्कृत केली आहेत. तरी या स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.










