नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ डिसेंबरला

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2025 17:06 PM
views 9  views

सावंतवाडी : विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार २७ रोजी सायंकाळी ७ वाजता विद्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक आप्पा सावंत हे असतील. फोंडा (गोवा) नगरपालिकेचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद कामत,  बांदाचे माजी उपसरपंच  राजाराम उर्फ बाळू सावंत उपस्थित राहणार आहेत. तसेच इन्सुली गावचे सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, माजी सभापती बाळा गावडे, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, विद्या विकास मंडळाचे माजी अध्यक्ष कृष्णाजी कोठावळे, माजी अध्यक्ष उमेश पेडणेकर आदी सह विद्या विकास मंडळ इन्सुलीचे विद्यमान उपाध्यक्ष, खजिनदार, सर्व पदाधिकारी, संचालक, सल्लागार, शिक्षक पालक संघांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  विद्यार्थ्यांनी वर्षभरात मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका सौ. सुविद्या  केरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. विशाखा  पालव, शालेय मुख्यमंत्री कु. वैष्णवी सांगेलकर, सांस्कृतिक मंत्री कु. तनिष  पालव,सर्व संस्था सदस्य यांनी केले आहे.